Home Breaking News सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी राजगड तालुक्यातील वेल्हे येथे पोलीस पाटलांचे मार्गदर्शन सत्र.

सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी राजगड तालुक्यातील वेल्हे येथे पोलीस पाटलांचे मार्गदर्शन सत्र.

20
0

 सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी राजगड तालुक्यातील वेल्हे येथे पोलीस पाटलांचे मार्गदर्शन सत्र.

वेल्हे (पुणे):

राजगड तालुक्यातील सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, तालुका सायबर गुन्हे मुक्त करण्याच्या उद्देशाने वेल्हे पोलीस स्टेशनच्या वतीने नागरिक जागृती अभियान राबवण्यात येत आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) श्री. किशोर शेवते यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सर्व पोलीस पाटलांचे मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले.  

दिनांक २ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता पार पडलेल्या या बैठकीत सायबर गुन्ह्यांपासून नागरिकांचे संरक्षण कसे करावे याबाबत माहिती देण्यात आली. या जनजागृती अभियानासाठी अमृतेश्वर महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. विलास (भाऊ) किरवे यांच्या सौजन्याने ३/४ आकाराचे सुमारे १०० सायबर अवेअरनेस बॅनर तयार करण्यात आले आहेत. हे बॅनर सर्व पोलीस पाटलांकडे सुपूर्द करण्यात आले असून गावातील मोक्याच्या व दर्शनी भागात लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  

सायबर विश्वात घडणाऱ्या फसवणुकीच्या प्रकारांपासून सावध राहण्याचे आणि सायबर सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन सपोनि श्री. किशोर शेवते यांनी नागरिकांना केले आहे