Home Breaking News काँग्रेसचा दुहेरी मतदानाचा दावा फोल; कर्नाटकच्या सीईओंचा खुलासा – बनावट कागदपत्रांवर कारवाईची...

काँग्रेसचा दुहेरी मतदानाचा दावा फोल; कर्नाटकच्या सीईओंचा खुलासा – बनावट कागदपत्रांवर कारवाईची मागणी

81
0
कर्नाटकात राजकीय वातावरण तापले आहे. शकुना राणी यांच्या नावाने दुहेरी मतदान झाल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने करत मोठा गाजावाजा केला होता.
मात्र, राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी (सीईओ) या प्रकरणाची तपासणी करून स्पष्ट केले की हा दावा पूर्णपणे खोटा आहे. बनावट कागदपत्रांचा आधार घेत नागरिकांची दिशाभूल करण्यात आली असून, हे केवळ लोकांचे लक्ष वेधण्यासाठीचे एक राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
सदर प्रकरणात काँग्रेसने जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवल्याचे पुरावे समोर आल्याने, आता संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. जनतेमध्ये गोंधळ निर्माण करणे, निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न निर्माण करणे आणि प्रशासनावर अविश्वास दाखवणे हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यात अडथळा निर्माण करणाऱ्या आणि खोटे दस्तऐवज सादर करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा आवाज बुलंद होत आहे.
यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चांगलाच खळबळ उडाली आहे. नागरिकांनीही खोटी माहिती पसरवणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.