Home Breaking News पिंपरीत सतर्कतेचा इशारा! संजय गांधी नगर परिसरात पावसाचा जोर आणि पवना धरण...

पिंपरीत सतर्कतेचा इशारा! संजय गांधी नगर परिसरात पावसाचा जोर आणि पवना धरण विसर्गामुळे नागरिकांना इशारा

59
0
पिंपरी, १९ ऑगस्ट २०२५:- पिंपरीतील संजय गांधी नगर परिसरात मुसळधार पावसाचा जोर वाढला असून, पवना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणीपातळी झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांना सजगतेचा इशारा देण्यात आला आहे.
पावसामुळे परिसरातील अनेक सखल भागात पाणी साचले असून, काही ठिकाणी रस्त्यांवर वाहतूक विस्कळीत झाली आहे. पवना धरणातून होणाऱ्या वाढीव विसर्गामुळे संजय गांधी नगर व आसपासच्या भागात पूरस्थितीची शक्यता असल्याने प्रशासनाने विशेष दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत.
 प्रशासनाचे आवाहन:
महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकांनी या भागात गस्त वाढवली आहे. नागरिकांनी नदीपात्राजवळ न जाणे, मुलांना बाहेर खेळण्यासाठी न सोडणे, तसेच सुरक्षिततेसाठी आवश्यक साहित्य तयार ठेवणे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, धोकादायक ठिकाणी राहणाऱ्यांना गरज पडल्यास सुरक्षित स्थळी हलवले जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष सतत संपर्कात असून, ध्वनीक्षेपकाद्वारे वारंवार इशारे दिले जात आहेत. परिसरातील नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीस अनुसरूनच निर्णय घ्यावा, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.3
“पिंपरीतील संजय गांधी नगरला पूराचा धोका! पवना धरण विसर्गामुळे प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा”