Home Breaking News हलक्या रणगाड्यावरून ‘नाग’ क्षेपणास्त्राचा यशस्वी प्रयोग; भारतीय सेनेची क्षमता पुन्हा सिद्ध!

हलक्या रणगाड्यावरून ‘नाग’ क्षेपणास्त्राचा यशस्वी प्रयोग; भारतीय सेनेची क्षमता पुन्हा सिद्ध!

61
0
भारतीय सेनेने हलक्या रणगाड्यावरून (Light Tank Platform) अत्याधुनिक ‘नाग’ अँटी-टँक गाईडेड मिसाईलचा यशस्वी परीक्षण केला आहे. या यशस्वी प्रयोगामुळे भारताच्या संरक्षण क्षमतेत मोठी भर पडली असून, यामुळे शत्रू राष्ट्रांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
या अत्याधुनिक क्षेपणास्त्राचा प्रयोग राजस्थानमधील पोकरण फायरिंग रेंजमध्ये करण्यात आला. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) व भारतीय सेनेने संयुक्तपणे हा प्रयोग यशस्वीरीत्या पूर्ण केला. हे मिसाईल १० किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर असलेल्या रणगाड्यांचा अचूक नाश करू शकते. याची गती आणि टार्गेट अचूकपणे साधण्याची क्षमता अतुलनीय आहे.
‘नाग’ क्षेपणास्त्र पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित केले गेले असून, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे हे एक मोठे पाऊल मानले जात आहे. या प्रयोगामुळे भारतीय लष्कराची आक्रमक क्षमता अधिक बळकट झाली असून, युद्धभूमीवरील शत्रूंना यामुळे मोठा धक्का बसणार आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “हा प्रयोग भारताच्या तांत्रिक सामर्थ्याचा आणि स्वावलंबी संरक्षण यंत्रणेचा आणखी एक ऐतिहासिक टप्पा आहे. नाग मिसाईल भविष्यात भारतीय रणांगणातील गेम चेंजर ठरेल.”
देशभरातून या यशाबद्दल DRDO आणि भारतीय सेनेचे अभिनंदन केले जात आहे. या यशामुळे भारताचे नाव पुन्हा एकदा जगातील सामर्थ्यवान देशांच्या यादीत उजळले आहे.