Home Breaking News “रस्त्यांच्या दुरवस्थेवर नागरिकांचा संताप! नितीन गडकरींना दुबईला पाठवण्याची मागणी सोशल मीडियावर जोर...

“रस्त्यांच्या दुरवस्थेवर नागरिकांचा संताप! नितीन गडकरींना दुबईला पाठवण्याची मागणी सोशल मीडियावर जोर धरते”

50
0
देशभरात रस्त्यांच्या निकृष्ट दर्जामुळे आणि सतत वाढणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावर सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे.
एका नागरिकाने व्यंगात्मक भाषेत लिहिले — “रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सरकारला तिकिटाचा खर्च झेपावत नसेल, तर लोकं वर्गणी करून तिकिट काढायला तयार आहेत मोदीजी. पण गडकरी साहेबांना एकदा दुबईला पाठवा!” या वक्तव्याने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.
या पोस्टला हजारो लोकांनी प्रतिसाद दिला असून, अनेकांनी रस्त्यांच्या दुरवस्थेवर संताप व्यक्त केला आहे. काहींनी तर सरकारकडे थेट मागणी केली आहे की, रस्ते दुरुस्तीचे काम नीट न करणाऱ्या कंत्राटदारांवर त्वरित कारवाई व्हावी.
दरम्यान, अनेक नागरिकांनी म्हटले आहे की, भारतातील अनेक रस्त्यांची अवस्था इतकी खराब झाली आहे की, प्रवास करणे म्हणजे जीवावर बेतणारे ठरते. पावसाळ्यात रस्त्यांवर तयार होणारे खड्डे हे अपघातांना आमंत्रण देतात.
गडकरी साहेब हे देशातील पायाभूत सुविधांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असले तरी, नागरिक आता प्रत्यक्ष सुधारणा पाहू इच्छित आहेत. सोशल मीडियावर सुरू असलेली ही टीका सरकारसाठी स्पष्ट संदेश आहे की, जनतेला आता सबबी नव्हे, परिणाम पाहिजेत.