Home Breaking News पुणे बंद, १०,००० विद्यार्थ्यांसह मुंबई मोर्चा , राहुल गांधीही येणार, MPSC प्रकरणात...

पुणे बंद, १०,००० विद्यार्थ्यांसह मुंबई मोर्चा , राहुल गांधीही येणार, MPSC प्रकरणात रोहित पवारांचा ४८ तासांचा अल्टीमेटम

16
0

पुणे बंद, १०,००० विद्यार्थ्यांसह मुंबई मोर्चा , राहुल गांधीही येणार, MPSC प्रकरणात रोहित पवारांचा ४८ तासांचा अल्टीमेटम 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) उमेदवारांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. तर दुसरीकडे रोहित पवार यांनी भाजप सरकारला पुणे बंदचा इशारा दिला आहे. राहुल गांधी हेसुद्धा विद्यार्थ्यांच्या पाठिंब्यासाठी आंदोलनात बसू शकतात.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांचे आंदोलन मंगळवारी सहाव्या दिवशीही सुरूच आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारला ४८ तासांचा कडक अल्टीमेटम दिला असून, विद्यार्थ्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशी मागणी केली आहे. या मागण्यांमध्ये अलीकडेच झालेल्या पेपर लीक प्रकरणांमुळे आणि पारदर्शकतेच्या अभावामुळे MPSC चे अध्यक्ष विवेक भिमणवार यांना त्वरित पदमुक्त करण्याचा समावेश आहे.