Home Breaking News ‘आईचे दूध सर्वोत्तम’ लिहिणे बंधनकारक, पाकिटावरील अशा फोटोवर बंदी; नियम मोडल्यास १०...

‘आईचे दूध सर्वोत्तम’ लिहिणे बंधनकारक, पाकिटावरील अशा फोटोवर बंदी; नियम मोडल्यास १० लाखांचा दंड महाराष्ट्र (FDA)

33
0

‘आईचे दूध सर्वोत्तम’ लिहिणे बंधनकारक, पाकिटावरील अशा फोटोवर बंदी; नियम मोडल्यास १० लाखांचा दंड महाराष्ट्र (FDA)

महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) लहान मुलांसाठी वापरल्या जाणाऱ्या फॉर्म्युला मिल्क आणि इतर बेबी फूडबाबत नवीन कडक नियम जारी केले आहेत. त्यानुसार, पाकिटावर ‘बाळासाठी आईचे दूध हाच सर्वोत्तम आहार’ असे लिहिणे अनिवार्य करण्यात आले आहे. परंतु, पाकिटावर बाळ किंवा आईचे छायाचित्र लावता येणार नाही.

एफडीएने दिलेल्या माहितीनुसार, फॉर्म्युला मिल्क आणि बाल आहाराच्या जाहिराती, मोफत नमुने (फ्री सॅम्पल), भेटवस्तू, कूपन, कॅशबॅक, इन्फ्लुएन्सर प्रमोशन आणि सोशल मीडिया प्रमोशनवर बंदी असेल. हे नियम उत्पादकांपासून ते ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मपर्यंत सर्वांना लागू होतील. तसेच, कुणी नियम मोडल्यास तब्बल १० लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

बेबी फूडमध्ये अनेक घटकांवरही बंदी घालण्यात आली आहे; जसे की प्रिझर्व्हेटिव्ह्ज (परिरक्षक), अतिरिक्त रंग आणि फ्लेवरिंग पदार्थांच्या वापरावर बंदी असेल. अतिरिक्त सुक्रोजचा वापर केवळ आवश्यकतेनुसार आणि एकूण कर्बोदकांच्या (कार्बोहायड्रेट्स) २० टक्क्यांपर्यंतच केला जाऊ शकेल. याशिवाय, दिशाभूल करणाऱ्या पद्धतींनी ‘नो ॲडेड शुगर’ असा दावा करण्यासही मनाई असेल