Home Breaking News कोण आहेत एस. चोक्कलिंगम? मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढवणारे...

कोण आहेत एस. चोक्कलिंगम? मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढवणारे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी

29
0

कोण आहेत एस. चोक्कलिंगम? मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढवणारे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी

 

​Maharashtra CEO Letter to ECI: महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून आपले अधिकार परत मागितले आहेत. चोक्कलिंगम यांच्या या पत्रामुळे, देशभरात एसआयआरची (SIR) प्रक्रिया आणि व्यवस्था केंद्रीयकृत करण्याच्या मुद्द्यावरून वादात सापडलेले मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.
​भारतीय निवडणूक आयोगातील (ECI) अंतर्गत मतभेद आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या मनमानी कारभारावर काँग्रेसने थेट पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) मुंबईत ‘जेल भरो’ आंदोलन करणार आहे. या सगळ्यात, महाराष्ट्रात निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांच्या सुरात सूर मिळवत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या समस्येत भर घातली आहे. महाराष्ट्रात मतदार यादीच्या विशेष गहन पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेदरम्यान राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला हे पत्र लिहिले आहे.