नागपूर–मुंबई समृद्धी महामार्गावर ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान वाहतूक ब्लॉक.

सिन्नर–इगतपुरीदरम्यान गॅन्ट्री बसविण्यासाठी ठराविक वेळेत वाहतूक पूर्णतः बंद
नाशिक : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) नागपूर–मुंबई समृद्धी महामार्गावर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (ITMS) बसविण्याचे काम सुरू आहे. या कामाचा एक भाग म्हणून सिन्नर आंतरबदल मार्गिका ते इगतपुरी आंतरबदल मार्गिका या टप्प्यात गॅन्ट्री बसविण्यात येणार आहे.
या कामासाठी ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत टप्प्याटप्प्याने वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकच्या वेळेत संबंधित मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद राहणार असून, काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत केली जाणार आहे.
📍 ३१ ऑगस्ट, १ व २ सप्टेंबर :
मुंबईच्या दिशेने: सिन्नर–भरवीर — दुपारी १२ ते १
नागपूरच्या दिशेने: सिन्नर–भरवीर — दुपारी ३ ते ४
📍 ४ ते ७ सप्टेंबर :
मुंबईच्या दिशेने: भरवीर–इगतपुरी — दुपारी १२ ते १
नागपूरच्या दिशेने: भरवीर–इगतपुरी — दुपारी ३ ते ४
ब्लॉकच्या कालावधीत वाहतूक पूर्णपणे बंद राहणार असल्याने समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी वेळेचे नियोजन करून प्रवास करावा, असे आवाहन एमएसआरडीसीने केले आहे.
