Home Breaking News रायगड CGST कार्यालयावर CBI ची धडक कारवाई; ४० लाखांची लाच घेताना अतिरिक्त...

रायगड CGST कार्यालयावर CBI ची धडक कारवाई; ४० लाखांची लाच घेताना अतिरिक्त आयुक्तांसह अधीक्षक व मध्यस्थ रंगेहाथ अटकेत

39
0

रायगड CGST कार्यालयावर CBI ची धडक कारवाई; ४० लाखांची लाच घेताना अतिरिक्त आयुक्तांसह अधीक्षक व मध्यस्थ रंगेहाथ अटकेत.

नवी मुंबई: दिनांक: २८ ऑगस्ट २०२६ ;केंद्रीय वस्तू व सेवा कर (CGST) विभागाच्या रायगड कार्यालयात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) एक मोठी कारवाई करत लाचखोरीचा पर्दाफाश केला आहे. एका दगडखाणी व्यवसायाशी संबंधित जीएसटी आणि रॉयल्टी प्रकरण मिटवून देण्यासाठी ४० लाख रुपयांची लाच स्वीकारताना सीबीआयने अतिरिक्त आयुक्तांसह अधीक्षक आणि एका खासगी मध्यस्थाला रंगेहाथ अटक केली आहे.

दगड उत्खनन करणाऱ्या एका कंपनीचे प्रलंबित प्रकरण पूर्णपणे बंद करण्यासाठी सीजीएसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुरुवातीला १ कोटी ५० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. वाटाघाटींनंतर ही रक्कम ४० लाख रुपयांवर निश्चित करण्यात आली. हे पैसे स्वीकारण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी नरेंद्र राजपूत या खासगी मध्यस्थाची मदत घेतली.

२७ ऑगस्ट २०२६ रोजी सीबीआयने सापळा रचून ४० लाख रुपयांची लाच स्वीकारताना मध्यस्थ नरेंद्र राजपूत याला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता या भ्रष्टाचारात अधिकाऱ्यांचा थेट सहभाग असल्याचे उघड झाले. त्यानंतर सीबीआयने तात्काळ खालील आरोपींना अटक केली:

१. विनय कुमार कांठेती – अतिरिक्त आयुक्त (केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ – IRS)

२. राकेश कुमार सिन्हा – अधीक्षक (CGST, रायगड)

३. नरेंद्र राजपूत – खासगी मध्यस्थ

झाडाझडतीत ४३ लाखांची रोख व ९० लाखांचे सोने जप्त:

अटकेच्या कारवाईनंतर सीबीआयच्या पथकाने आरोपींच्या निवासस्थानी व इतर संबंधित ठिकाणी छापे मारले. या झाडाझडतीदरम्यान सीबीआयने ४३ लाख रुपयांची रोकड आणि सुमारे ९० लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहेत.

सर्व आरोपींवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सीबीआय या प्रकरणी पुढील तपास करत आहे