Home Breaking News सहा दिवसांच्या खंडानंतर अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू; 15 हजार भाविक रवाना, वैष्णोदेवी...

सहा दिवसांच्या खंडानंतर अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू; 15 हजार भाविक रवाना, वैष्णोदेवी यात्रेबाबत अद्याप निर्णय नाही

42
0

सहा दिवसांच्या खंडानंतर अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू; 15 हजार भाविक रवाना, वैष्णोदेवी यात्रेबाबत अद्याप निर्णय नाही

जम्मू : सलग पावसामुळे सहा दिवस स्थगित ठेवण्यात आलेली श्री अमरनाथ यात्रा शनिवारपासून पुन्हा सुरू करण्यात आली. हवामानात सुधारणा झाल्यानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला. मात्र, सध्या भाविकांना केवळ बालटाल मार्गाने यात्रेसाठी रवाना करण्यात आले आहे.

पहलगाम मार्गावरील यात्रेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्या मार्गाची स्थिती आणि हवामानाचा आढावा घेतल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

जम्मूमध्ये अडकून पडलेल्या शिवभक्तांना बालटाल मार्गाने यात्रा सुरू झाल्याची माहिती मिळताच त्यांनी ‘हर हर महादेव’ आणि ‘जय बाबा बर्फानी’ अशा घोषणांनी आनंद व्यक्त केला.

दरम्यान, माता वैष्णोदेवी यात्रा पुन्हा सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.