Home Breaking News सुप्रिया सुळे यांनी प्रियंका गांधींसोबतचा तिरंगा हातातील फोटो शेअर करत दिला ‘जय...

सुप्रिया सुळे यांनी प्रियंका गांधींसोबतचा तिरंगा हातातील फोटो शेअर करत दिला ‘जय हिंद’चा संदेश

24
0

सुप्रिया सुळे यांनी प्रियंका गांधींसोबतचा तिरंगा हातातील फोटो शेअर करत दिला ‘जय हिंद’चा संदेश

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या सोशल मीडिया खात्यावर काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांच्यासोबतचा तिरंगा हातात घेतलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यांनी “जय हिंद” असे कॅप्शन दिले आहे.

या फोटोसह सुप्रिया सुळे यांनी एक व्हिडिओ ही शेअर केला असून त्यामध्ये त्यांनी सविस्तर संदेश दिला आहे. त्यांनी सांगितले की, INDIA आघाडीच्या सर्व खासदारांनी गांधी स्मृती येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले. श्रद्धांजली कार्यक्रमात सहभागी होत महात्मा गांधींना आदरांजली अर्पण करण्यात आल्याची माहितीही त्यांनी आपल्या पोस्टद्वारे दिली.