पश्चिम आशियातील संकटाचा परिणाम: ‘खत अनुदानातील 40% रक्कम अवघ्या साडेतीन महिन्यांत खर्च’, राज्यसभेत सरकारची माहिती
सरकारने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या साडेतीन महिन्यांतच खत अनुदानासाठीच्या एकूण तरतुदीपैकी 40 टक्के रक्कम खर्च केली आहे. जागतिक तणाव आणि खतांच्या वाढलेल्या किमतींमुळे यंदा खत अनुदानाचा एकूण खर्च अर्थसंकल्पीय अंदाजापेक्षा अधिक होण्याची शक्यता असल्याची माहिती सरकारने राज्यसभेत दिली.