Home Breaking News जागतिक बँक समूहाच्या शिष्टमंडळाची पुणे महानगरपालिकेस भेट.

जागतिक बँक समूहाच्या शिष्टमंडळाची पुणे महानगरपालिकेस भेट.

20
0

जागतिक बँक समूहाच्या शिष्टमंडळाची पुणे महानगरपालिकेस भेट.

शहरातील पायाभूत सुविधांचा विकास, तांत्रिक सहकार्य आणि शाश्वत नागरी सेवांबाबत चर्चा.
पुणे, दि. २३ ऑक्टोबर २०२६
जागतिक बँक समूहाच्या (World Bank Group) वरिष्ठ शिष्टमंडळाने आज पुणे महानगरपालिकेस भेट देऊन महापालिका आयुक्त मा. श्री. नवल किशोर राम यांच्यासह महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. या शिष्टमंडळाचे नेतृत्व जागतिक बैंक समूहाच्या मा. रिजन प्रॅक्टिस डायरेक्टर (जल क्षेत्र) मा. श्रीमती माग वॉर्विक यांनी केले.
या बैठकीम मा.अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) श्रीमती पवनीत कौर, मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) श्री. ओमप्रकाश दिवटे, मा. शहर अभियंता श्री. अनिरुद्ध पावसस्कर, मा. सह आयुक्त 
अधिकारी (CAFO) श्रीमती उल्का कळसकर, मा. मुख्य अभियंता (पाणीपुरवठा) श्री. नंदकिशोर जगताप, मा. मुख्य अभियंता (प्रकल्प) मा. श्री. दिनकर गोजारे आणि मा. मुख्य अभियंता (पथ) मा. श्री. राजेश बनकर उपस्थित होते.
जागनिक बैंक समूहाच्या शिष्टमंडळामध्ये आंतरराष्ट्रीय पुनर्वाधणी व विकास बँकेच्या (IBRD) मा. रिजन प्रैक्टिस डायरेक्टर (जल क्षेत्र) श्रीमती मारा वॉर्विक, मा. प्रैक्टिस डायरेक्टर (जल क्षेत्र) श्री. विल्यम रेक्म, आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळाचे (IFC) मा. व्यवस्थापक (भारत, भूतान व मालदीव पायाभूत सुविधा) श्री. नुरु लामा, IBRD चे मा. वरिष्ठ जलतज्ज्ञ व MUWREP प्रकल्पाचे मा. पथकप्रमुख श्री. हर्ष गोयल, तसेच IFC चे प्रमुख गुंतवणूक अधिकारी व MUWREP प्रकल्पाचे मा. मह-पथकप्रमुख श्री. नीरज गुप्ता यांचा समावेश होता.
पुणे महानगरपालिका क्षेत्रातील, तसेच महापालिकेत समाविष्ट आलेल्या गावांमधील पाणीपुरवठा, मलनिम्मारण आणि पावसाळी पाणी निचरा या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी महापालिकेमार्फत एकात्मिक आणि सर्वसमावेशक पद्धतीने करण्यात येत असलेल्या कामकाजाचे निष्टमंडळाने कौतुक केले. शहरातील नागरी पायाभूत स्विधांचा नियोजनबद्ध विकास आणि नागरिकाना अधिक चांगल्या नागरी सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या या दृष्टिकोनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
या बैठकीत पायाभूत सुविधा विकामामाठी संभाव्य वित्तपुरवठा, तांत्रिक महकार्य, संस्थात्मक क्षमता बळकटीकरण आणि आतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम कार्यपद्धतीचा अवलंब यांसारख्या विषयांवर चर्चा करण्यात आली. पुणे शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन पाणीपुरवठा, मलनिस्सारण आणि पावसाळी पाणी निचरा यांसारख्या महत्त्वपूर्ण नागरी सेवांचे नियोजन व बळकटीकरण करण्यासाठी महकार्याच्या विविध संधींचा आढावा घेण्यात आला.
या भेटीमुळे पुणे महानगरपालिकेच्या नागरी पायाभूत सुविधा विकासाच्या प्रयत्रांना अधिक बळ मिळण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण चर्चा झाली. पुणे शहरातील नागरिकाना विश्वासार्ह, समानतेच्या तत्वावर आधारित आणि शाश्वत नागरी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने पुणे महानगरपालिका आणि जागतिक बैंक समूह यांच्यातील सहकार्याची बांधिलकी या बैठकीत पुन्हा अधोरेखित करण्यात आली.