Home Breaking News महाराष्ट्रात ATS ची पहाटेपासून मोठी धडक कारवाई; 8 शहरांत छापे, 112 संशयितांची...

महाराष्ट्रात ATS ची पहाटेपासून मोठी धडक कारवाई; 8 शहरांत छापे, 112 संशयितांची चौकशी.

27
0

महाराष्ट्रात ATS ची पहाटेपासून मोठी धडक कारवाई; 8 शहरांत छापे, 112 संशयितांची चौकशी.

मुंबई :१० जुलै ; दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) शुक्रवारी पहाटेपासून महाराष्ट्रभर मोठे ऑपरेशन सुरू केले. राज्यातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मिरा रोड, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगरसह आठ शहरांमध्ये ATS च्या 14 पथकांनी एकाचवेळी छापेमारी केली. या कारवाईत पाकिस्तानस्थित कुख्यात गँगस्टर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर शहजाद भट्टी याच्याशी कथित संपर्क असलेल्या 112 संशयितांची चौकशी सुरू आहे.

तपासादरम्यान संशयितांचे मोबाईल फोन, लॅपटॉप, सोशल मीडिया अकाउंट्स आणि इतर डिजिटल उपकरणांची तपासणी करण्यात येत आहे. सध्या कोणालाही अधिकृतपणे अटक करण्यात आलेली नसून, चौकशीतून मिळणाऱ्या पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती ATS सूत्रांनी दिली आहे.

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, शहजाद भट्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तरुणांशी संपर्क साधून त्यांना कथित देशविरोधी कारवायांसाठी प्रवृत्त करत असल्याचा संशय आहे. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची पार्श्वभूमी, आर्थिक व्यवहार आणि ऑनलाइन हालचालींची सखोल चौकशी सुरू आहे.

शहजाद भट्टी हा पाकिस्तानातील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून प्रसिद्ध झाला होता. तो ‘333’ या नावाने यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय होता. भारतीय तपास यंत्रणांच्या मते, त्याचे पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI शी कथित संबंध असून, सोशल मीडियाद्वारे भारतातील तरुणांना हेरगिरी, दहशतवादी कारवाया आणि टार्गेट किलिंगसारख्या गंभीर गुन्ह्यांसाठी वापरण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

ATS ची ही कारवाई महाराष्ट्रासह देशातील कथित सोशल मीडिया नेटवर्क उघड करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात असून, चौकशीतून आणखी महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आह