Home Breaking News पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई! तीन आरोपी अटकेत; चार गावठी पिस्तुले, सहा...

पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई! तीन आरोपी अटकेत; चार गावठी पिस्तुले, सहा जिवंत काडतुसे आणि ₹11.22 लाखांचा मुद्देमाल जप्त.

25
0

पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई! तीन आरोपी अटकेत; चार गावठी पिस्तुले, सहा जिवंत काडतुसे आणि ₹11.22 लाखांचा मुद्देमाल जप्त.

Pune: 10 जुलै ; पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवैध शस्त्रास्त्रांविरोधात मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चार गावठी पिस्तुले, सहा जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने असा एकूण ₹11,22,500 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. सुनील फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध अग्निशस्त्रांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तीन वेगवेगळ्या कारवाया करण्यात आल्या.

पहिल्या कारवाईत  बारामती मधुन संग्राम लक्ष्मण पवार (रा. पानगाव, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) याच्याकडून दोन गावठी पिस्तुले, दोन जिवंत काडतुसे आणि एकूण ₹4.20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दुसऱ्या कारवाईत इंदापूर मधुनअर्जुन बाबासाहेब गवळी (रा. पानगाव, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) याच्याकडून एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे व एकूण ₹3.50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तिसऱ्या कारवाईत यवत मधुन सनी कुमार कडियार (रा. बेगूसराय, बिहार; सध्या पुणे परिसर) याच्याकडून एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे व एकूण ₹3.52 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तीन्ही आरोपींविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) व शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून, या अवैध शस्त्रांचा पुरवठा कोणी केला आणि त्यामागील रॅकेटचा तपास पुणे ग्रामीण पोलीस करत आहेत.

बातमीतील प्रमुख अधिकारी

श्री. सुनील फुलारी – विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र

श्री. संदीपसिंह गिल – पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण

श्री. गणेश बिरादार – अपर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण

अटक आरोपी

संग्राम लक्ष्मण पवार

अर्जुन बाबासाहेब गवळी

सनी कुमार कडियार.