Home Breaking News विना लेबल व भेसळीच्या संशयावरून तुप व नमकीन या अन् पदार्थाचा साठा...

विना लेबल व भेसळीच्या संशयावरून तुप व नमकीन या अन् पदार्थाचा साठा जप्त.

31
0

विना लेबल व भेसळीच्या संशयावरून तुप व नमकीन या अन् पदार्थाचा साठा जप्त.

आस्थापनेचा अन्न परवाना निलंबित- सह आयुक्त (अन्न्) दि.वा.भोगावडे

 

पुणे, दि. 3: अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात ‘सेफ फुड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ राबविण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासन पुणे विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विशेष मोहिमेअंतर्गत मे. देवांश मिल्क अॅन्ड मिल्क प्रॉडक्टस, स नं. 21/1/3, शिव पार्वती अंगण, भालेकर नगर, पिंपळे गुरव, पुणे या आस्थापनेची तपासणीवेळी 230 कि.ग्रॅ. रुपये 90 हजार 500 किंमतीचा साठा विना लेबल व भेसळीच्या संशयावरुन जप्त करण्यात आला. तपासणीदरम्यान आढळून आलेल्या त्रुटींची गंभीर दखल घेत ग्राहकांच्या आरोग्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने संबंधित आस्थापनेचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती. शि. ग. घाटोळ यांनी श्री. सा. सु. पटवर्धन, श्री. अक्षय शेळके यांच्या पथकाने श्री. विश्वजीत शिंदे, सहायक आयुक्त (अन्न) यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

पुणे विभागातील सोलापुर कार्यलयाकडून मे. संगीता फूड प्रॉडक्टस, मड्डे वस्ती, सोलापुर या आस्थापनेची सखोल तपासणी करुन नमकीन या अन्न पदार्थाचा 160 कि.ग्रॅ, किंमत रु. 32 हजार किंमतीचा साठा लेबलमधील त्रुटी व भेसळीच्या संशयावरुन जप्त करण्यात आला. ही कारवाई साहेबराव देसाई, सहायक आयुक्त् (अन) यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती. कि. घ. देशमुख यांनी केली.

“विनापरवाना अथवा नियमबाह्य पद्धतीने अन्न व्यवसाय करणाऱ्या तसेच दर्जाहीन, भेसळयुक्त अथवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अन्नपदार्थांचे उत्पादन, प्रक्रिया व विक्री करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनामार्फत यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती सह आयुक्त (अन्न्) दि.वा.भोगावडे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.