Home Breaking News महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.

महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.

26
0

महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.

पिंपरी, दि. ३० एप्रिल २०२६ :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जीवन म्हणजे सेवा, साधेपणा आणि समाजजागृती यांचा आदर्श आहे, त्यांनी दिलेला स्वच्छता, श्रमसंस्कार आणि एकात्मतेचा संदेश आजच्या काळातही महत्त्वाचा ठरतो असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील त्यांच्या प्रतिमेस महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

या प्रसंगी उपआयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कार्यकारी अभियंता सुनीलदत्त नरोटे, सुनील पवार, सहाय्यक आरोग्य अधिकारी शांताराम माने, कामगार नेते नागेश जाधव आदी उपस्थित होते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे महाराष्ट्रातील एक थोर संत, समाजसुधारक आणि राष्ट्रभक्त होते. त्यांनी कीर्तन, भजन या माध्यमातून समाजजागृती केली. त्यांनी ‘ग्रामगीता’ सारख्या ग्रंथातून आदर्श ग्रामविकास, स्वच्छता, श्रमसंस्कार आणि नैतिक जीवनाचा संदेश दिला. स्वातंत्र्य चळवळीतही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि देशभक्तीची भावना जनमानसात रुजवली. त्यांचे संपूर्ण आयुष्य समाजप्रबोधन, स्वावलंबन आणि मानवतेच्या मूल्यांसाठी समर्पित होते. त्यामुळेच त्यांना ‘राष्ट्रसंत’ ही उपाधी बहाल करण्यात आली.