Home Breaking News मुंबई:गोवंडीत सहा मांजरांची कथित हत्या; ‘मालिकाबद्ध मांजर-हत्यारा’चा (serial cat killer) पोलीस शोध...

मुंबई:गोवंडीत सहा मांजरांची कथित हत्या; ‘मालिकाबद्ध मांजर-हत्यारा’चा (serial cat killer) पोलीस शोध घेत आहेत

34
0

मुंबई:गोवंडीत सहा मांजरांची कथित हत्या; ‘मालिकाबद्ध मांजर-हत्यारा’चा (serial cat killer) पोलीस शोध घेत आहेत. मुंबईतील गोवंडी येथील पंजरपोळ परिसरात सहा मांजरांच्या कथित हत्येची घटना समोर आली आहे.

प्राणीप्रेमी रुबिना पठाण यांच्या तक्रारीवरून आरसीएफ (RCF) पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. अज्ञात संशयितांची ओळख पटवण्यासाठी पोलीस घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. पोलिसांत दाखल झालेल्या तक्रारीनुसार, ५३ वर्षीय रुबिना पठाण यांना ३ सप्टेंबर रोजी या परिसरात चार मांजरांचे मृतदेह आढळले. त्यानंतर, ५ सप्टेंबर रोजी कामावाडी परिसरात आणखी एक मांजर मृतावस्थेत आढळले.