शेतकरीआणि ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्याच्या दिशेने राज्य शासन प्रयत्नशील-पणनमंत्रीजयकुमार रावल.

राजधानी नवी दिल्ली येथे आंबा महोत्सवाचे आयोजन करणार-पणन मंत्री जयकुमार रावल
पणनपणन मंत्र्यांच्या हस्ते ‘आंबा महोत्सव-२०२६’चे उद्घाटन
पुणे, दि.११:‘फळांचाराजा’ म्हणून ओळखला जाणारा आंबा हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यामुळे महाराष्ट्रराज्य कृषी पणन मंडळाच्या माध्यमातून येत्या काळात महाराष्ट्राची राजधानी मुबंई आणिदेशाची राजधानी नवी दिल्ली येथे आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल, याकरीता शेतकऱ्यांनाअधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. एकूणच राज्याचा शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थासक्षम करण्याच्या दिशेने राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राज्याचे पणन मंत्रीजयकुमार रावल यांनी केले.
महाराष्ट्रराज्य कृषी पणन मंडळ आणि पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने मार्केट यार्ड येथे आयोजित ‘आंबामहोत्सव-२०२६’ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचेसभापती प्रकाश जगताप, कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे आदी उपस्थितहोते.
श्री. रावलम्हणाले, सन २००१ मध्ये महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या कार्यालय आवारात देवगडतालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था, देवगड आणि महामँगो यांच्या माध्यमातून सुरू झालेलीउत्पादक ते ग्राहक थेट आंबा विक्रीची संकल्पना आज एका मोठ्या वटवृक्षात रूपांतरित झालेलीआहे. अनेक वर्षाची परंपरा असलेल्या या आंबा महोत्सवाच्या माध्यमातून अनेक बदल टप्प्यानेबदल करुन या वर्षी रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहेत.
यावर्षीचामहोत्सव सुमारे ४० दिवस सुरू राहणार असून यामध्ये एकूण ६० स्टॉल असून प्रत्येक दोनशेतकरी आंबा विक्री करीत आहे. येत्या काळात पणन मंडळाच्यावतीने सुमारे १५० स्टॉल उभेकरण्याचा प्रयत्न आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून शेतकरी आपला आंबा थेट ग्राहकांनाविकून कायमची शृखंला निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतो आणि शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्येकायमचे संबंध निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
महोत्सवातकोकणातील पाच जिल्ह्यांमधील भौगोलिक मानांकन प्राप्त हापूस आंबा तसेच राज्यातील केशर,पायरी आणि इतर विविध वाणांचे आंबे उपलब्ध होणार आहेत. शेतकऱ्यांना हापूस आंब्यासाठी जीआय मानांकन मिळालेआहे.भौगोलिक मानांकनामुळे अस्सल हापूस ओळखतायेतो व फसवणूक कमी होते.
बदल्या काळानुसार’क्यूआर कोड’च्यामाध्यमातून आंबा फळाला नव्याने ओळख करुन देण्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर’नो युवर फार्मर’ (एनयुएफ) ही संकल्पनेच्या माध्यमातून ग्राहकांना थेट शेतकऱ्यांचीमाहिती मिळणार आहे, ज्यामुळे विश्वासार्हता अधिक वाढेल. आगामी काळात समाज माध्यमाचाप्रभावीपणे वापर करुन मोठ्या प्रमाणात या महोत्सवाचे मार्केटिंग करण्यात येणार आहे.
राज्याचेमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी पणन मंडळाच्या माध्यमातूनराज्यात उत्पादकांना थेट ग्राहकांशी जोडण्याच्या उद्देशाने मिलेट महोत्सव, संत्रा महोत्सव,आंबा महोत्सव, काजू-बेदाणा महोत्सव अशा विविध महोत्सवांचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमांमध्येशेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था, पणन संस्था, महिला आर्थिक विकास महामंडळाच्यासीएमआरसी तसेच महिला बचत गटांचा सक्रिय सहभाग असतो.
आंबा महोत्सवाचाउद्देश शेतकरी आणि ग्राहक या दोघांचे हित साधणारा आहे, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री वाढवणे, मध्यस्थ कमी करणे आणि आंबा उत्पादकांनाथेट ग्राहक उपलब्ध करून देणे.
मध्यस्थांनावगळून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव आणि ग्राहकांना रास्त दरात उत्तम, दर्जेदार, नैसर्गिकपद्धतीने पिकवलेले, भौगोलिक मानांकन असलेले आंबे या महोत्सवामुळे मिळतात.
उष्णकटिबंधीयव उपोष्णकटिबंधीय हवामानामुळे आपल्या देशात आंब्याच्या लागवडीसाठी अत्यंत अनुकूल परिस्थितीआहे.
कोकणातीलठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सुमारे १ लाख ७० हजारहेक्टर क्षेत्रावर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. हापूस आंबा त्याच्या चव, सुगंध आणिगुणवत्तेसाठी जगभर प्रसिद्ध आहे. तसेच लातूर, बीड, अहिल्यानगर, नाशिक, सोलापूर या भागातकेशर आंबा उत्पादन घेण्यात येत आहे. शेतकऱ्यांचा मालाला अधिकाधिक भाव मिळून त्याचीआर्थिक स्थर्यता मिळू शकेल.
आंतरराष्ट्रीयतसेच देशांतर्गत व्यापार वृद्धीसाठीही पणन मंडळाच्या माध्यमातून दिल्ली, राजस्थान,गुजरात, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू आणिकेरळ या राज्यांमध्ये अधिकाऱ्यांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात येणार आहे. या दौऱ्याचाउद्देश देशातील महत्त्वाच्या बाजारपेठांचा अभ्यास करणे, विविध राज्यांमध्ये शेतमालविक्री व्यवस्थेत राबविण्यात येणाऱ्या नवकल्पनांची माहिती घेणे तसेच कृषी उत्पन्न बाजारसमित्या, व्यापारी, निर्यातदार आणि प्रक्रिया उद्योग यांच्याशी संबंधित माहिती संकलितकरणे हा आहे.
मॅग्नेट प्रकल्पाच्यामाध्यमातून राज्यातील फळे, भाजीपाला आणि फुलांच्या मूल्यसाखळी विकासासाठी प्रयत्न करण्यातयेत आहे. जगातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्र राज्यात निर्माणकरण्यात येणार असून ती समुद्र, रेल्वे, विमानतळ आणि महामार्गाशी जोडण्यात येणार आहे,याकरिता जागा निश्चित करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा माल बांधापासून ते
ग्राहकांपर्यंतपोहोचण्यासाठी जलदपुरवठा साखळी विकसित करण्याचा प्रयत्न आहे.
केळीचे कलस्टरनिर्मिती तसेच कांदा प्रक्रिया संदर्भात योजना आखण्यात येत आहे. अशा विविध उपक्रमांच्यामाध्यमातून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाचे मूल्यवर्धन करून आपल्या शेतकऱ्यांनादेशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विविध फळांची ब्रॅण्डिंग करण्यासाठी उपाययोजनाकेल्या जात आहेत, असेही श्री.रावल म्हणाले.
श्री. जगतापम्हणाले, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्यावतीने आंबा महोत्सवाकरिता अधिकाधिक आंबाउत्पादक शेतकऱ्यांना जागा उपलब्ध करुन देण्यात येईल. नागरिकांनी या महोत्सवात सहभागीहोऊन आंबा खरेदी करावा, असे आवाहन श्री. जगताप यांनी केले.
श्री. कदमम्हणाले, या वर्षीचा आंबा महोत्सव १० एप्रिल ते ३१ मे २०२६ या कालावधीत पुणे मार्केटयार्डयेथे आयोजन करण्यात आला असून या महोत्सवाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. गेल्यावर्षी ३४लाख डझन आंबा विक्री झाली असून सव्वा दोनशे कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. मागील ३वर्षांपासून विभागीय आंबा महोत्सव आयोजित करण्यात येत असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसादलाभत आहे. पणन मंत्री यांच्या निर्देशानुसार आगामी काळात मंत्रालय, महाराष्ट्र सदन,महाराष्ट्र मंडळ येथे आंबा महोत्सव आयोजन करण्यात येणार आहे, असेही श्री.कदम म्हणाले.
उद्घाटनंतरमंत्री श्री. रावल यांनी स्टॉल भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.