Home Breaking News एसटी बसेसची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी, महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईकच्या विविध उपाययोजना.

एसटी बसेसची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी, महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईकच्या विविध उपाययोजना.

100
0

एसटी बसेसची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी, महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक च्या विविध उपाययोजना.

मुंबई: राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी, सरकारने महसूल वाढवण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी अनेक ठोस पावले उचलली आहेत. परिवहन मंत्री आणि राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, केवळ डिझेल खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणल्यामुळे अंदाजे २४१ कोटी रुपयांची वार्षिक बचत सुनिश्चित झाली आहे.

 एसटी बसेसना आता डिझेल प्रति लिटर ५ रुपयांनी स्वस्त मिळणार, अशी घोषणा महाराष्ट्राचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. मंत्री सरनाईक म्हणाले की, सध्या एसटी महामंडळावर सुमारे 12 हजार कोटी रुपयांचा संचित तोटा आहे. चालू आर्थिक वर्षातही फेब्रुवारी 2026 अखेर सुमारे 750 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.

दररोज एसटीच्या उत्पन्नापेक्षा 1 ते 2 कोटी रुपये अधिक खर्च होत असल्याने केवळ तिकीट विक्रीवर अवलंबून राहणे शक्य नाही. त्यामुळे पर्यायी उत्पन्न स्रोत निर्माण करणे ही काळाची गरज बनली आहे. चालू आर्थिक वर्षात डिझेल बचतीबरोबरच बस आणि स्थानकांवरील डिजिटल जाहिरातीतून सुमारे 250 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.