मुंबई विमानतळाचे टर्मिनल-१ पाडण्यावरून विमानतळ चालवणारी अदानी समूहाची कंपनी ‘MIAL’ आणि एअरलाइन्स यांच्यात वाद निर्माण झाला आहे.
हा वाद मिटवण्यासाठी आता नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांनी दिल्लीत बैठक बोलावली आहे. मुंबई विमानतळाच्या शिफ्टिंगवरून वाद सुरू झाला आहे. विमानतळाचे संचालन करणारा अदानी समूह आणि एअरलाइन्स यांच्यात चढाओढ सुरू आहे. हा वाद मिटवण्यासाठी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक सचिव समीर सिन्हा यांनी मंगळवारी एअरलाइन्स आणि मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) यांची एक बैठक बोलावली आहे. काही उड्डाणे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (NMIA) हलवणे आणि मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ (T1) च्या टप्प्याटप्प्याने पुनर्विकास (रीडेव्हलपमेंट) सुरू करण्याबाबत निर्माण झालेल्या गतिरोधावर योग्य तो तोडगा काढणे हा या बैठकीचा उद्देश आहे.