Home Breaking News मुंबईतील माटुंग्यात १०,४३२ घरांच्या बांधकामाला अदानींकडून सुरुवात;

मुंबईतील माटुंग्यात १०,४३२ घरांच्या बांधकामाला अदानींकडून सुरुवात;

16
0

मुंबईतील माटुंग्यात १०,४३२ घरांच्या बांधकामाला अदानींकडून सुरुवात;भूमिपूजन सोहळा संपन्न;

धारावीसाठी आनंदाची बातमी अदानी एंटरप्रायझेसचे संचालक प्रणव अदानी यांच्या हस्ते माटुंग्यातील २२ एकर क्षेत्रावरील निवासी पुनर्वसन प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. यासोबतच, आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टी वस्त्यांपैकी एक असलेल्या धारावीतील पात्र रहिवाशांसाठी १०,४३२ घरांच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे.

अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड (AEL) चे संचालक प्रणव अदानी यांनी माटुंगा रेल्वेच्या २२ एकर भूखंडावर ‘भूमीपूजन’ केले. यासह, आशियातील सर्वात मोठ्या अनधिकृत वस्त्यांपैकी एक आणि दहा लाखांहून अधिक लोकांचे निवासस्थान असलेल्या धारावीच्या पुनर्वसनाचे बांधकाम कार्य सुरू झाले आहे. या ठिकाणी १० उंच टॉवर्स उभारले जाणार असून, त्यात पुनर्वसनासाठी १०,४३२ सदनिका आणि १,३७९ व्यावसायिक व औद्योगिक युनिट्सचा समावेश असेल. हा प्रकल्प ‘अदानी नवभारत डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड’ (ANDPL) द्वारे राबविला जात आहे.

हा महाराष्ट्र सरकार आणि अदानी समूह यांच्यातील संयुक्त उपक्रम आहे. ‘इन-सिटू’ (जागेवरच) पुनर्वसन योजनेअंतर्गत, पात्र कुटुंबांना ३५० चौरस फुटांचे सदनिका (फ्लॅट्स) उपलब्ध करून दिले जातील.