Home Breaking News सहा महिन्यांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद; पौड पोलिसांची धडाकेबाज कारवाई; फरार आरोपीला...

सहा महिन्यांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद; पौड पोलिसांची धडाकेबाज कारवाई; फरार आरोपीला शिताफीने पकडले.

27
0

सहा महिन्यांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद; पौड पोलिसांची धडाकेबाज कारवाई; फरार आरोपीला शिताफीने पकडले 

पौड | ५ सप्टेंबर २०२६ :

गेल्या सहा महिन्यांपासून मोक्काच्या आरोपात फरार असलेल्या आरोपीला पौड पोलिसांनी जेरबंद केले आहे. हर्षद संतोष मोरे (रा. मोरवाडी, रिहे, ता. मुळशी) याला पोलिसांनी अटक केली.

रिहे खोऱ्यात दहशत निर्माण करणाऱ्या मंगेश पाळवे टोळीवर पौड पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाई केली होती. या प्रकरणात अगोदरच मंगेश नामदेव पाळवे, अथर्व नितीन मोरे आणि योगेश प्रकाश देवकर यांना अटक करण्यात आली होती. हर्षद संतोष मोरे व गणेश सुनील मोरे हे दोघे फरार होते.

हर्षद मोरे हा चाले ते घाटवडे रोडवर येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पौड पोलीस निरीक्षक महेश मेमाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून हर्षद मोरे याला शिताफीने ताब्यात घेतले.

या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, पोलीस हवालदार अमित ठोसर, प्रशांत बुगणे, पोलीस नाईक आकाश पाटील आणि बाबा पाटील यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. फरार आरोपीला जेरबंद केल्याने पौड पोलिसांच्या कारवाईचे कौतुक होत आहे.