Home Breaking News पुणे-नागपूर थेट विमानसेवा पुन्हा सुरू; स्टार एअरची आठवड्यातून दोन दिवस उड्डाणे.

पुणे-नागपूर थेट विमानसेवा पुन्हा सुरू; स्टार एअरची आठवड्यातून दोन दिवस उड्डाणे.

41
0

पुणे-नागपूर थेट विमानसेवा पुन्हा सुरू; स्टार एअरची आठवड्यातून दोन दिवस उड्डाणे.

पुणे : २७ सप्टेंबर २०२६

पुणे आणि नागपूरदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. स्टार एअरने बंद केलेली पुणे-नागपूर थेट विमानसेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सणासुदीच्या काळातील वाढती प्रवासी संख्या आणि दोन्ही शहरांदरम्यानची मागणी लक्षात घेऊन ही सेवा पुन्हा सुरू करण्यात येत आहे.
पुण्याहून नागपूरला जाणारे एस-५२५४ हे विमान शुक्रवार आणि रविवारी रात्री ८.३५ वाजता पुणे विमानतळावरून सुटेल आणि रात्री १०.०५ वाजता नागपूरला पोहोचेल. तर नागपूरहून पुण्याकडे येणारे एस-५२५३ हे विमान सोमवार आणि शनिवारी सकाळी ६.४५ वाजता नागपूरहून सुटून सकाळी ८.१५ वाजता पुण्यात दाखल होईल.
स्टार एअरने या मार्गासाठी सुरुवातीचे भाडे ६,७९९ रुपये निश्चित केले आहे. थेट विमानसेवा उपलब्ध झाल्यामुळे प्रवाशांना कनेक्टिंग फ्लाइट्सचा त्रास तसेच विमानतळावर दीर्घकाळ प्रतीक्षा करण्याची गरज कमी होणार आहे.
स्टार एअरने जवळपास वर्षभरापूर्वी पुणे-नागपूर मार्गावरील सेवा बंद केली होती. मात्र, या मार्गावर प्रवाशांची मागणी कायम असल्याने आता ही सेवा पुन्हा सुरू केली जात आहे. व्यावसायिक, विद्यार्थी, नोकरदार तसेच सुट्टीसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना या सेवेमुळे वेळेची बचत होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, शनिवारी नागपूर विमानतळावरील विमानसेवेलाही काही प्रमाणात व्यत्यय आला. काही विमानांना विलंब झाला. रात्री ९.२० वाजता नागपूरहून दिल्लीला जाणारे इंडिगोचे 6E-6573 विमान तांत्रिक अडचणीमुळे शेवटच्या क्षणी रद्द करण्यात आले. त्यामुळे संबंधित प्रवाशांना गैरसोय आणि मनस्ताप सहन करावा लागला