गुरुवारी उदयपूरहून पुण्याकडे जाणाऱ्या एका खाजगी प्रवासी बसला भीषण आग लागली. प्राथमिक तपासानुसार, वातानुकूलित यंत्रणेतील (एसी) तांत्रिक बिघाड हे या आगीचे संभाव्य कारण असल्याचे दिसून आले आहे.
सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. ग्रेटर नोएडा येथील बसला लागलेल्या आगीच्या दुर्दैवी घटनेनंतर, आता महाराष्ट्रातही धावत्या प्रवासी बसला आग लागल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी उदयपूरहून पुण्याकडे निघालेल्या एका खाजगी बसला अचानक आग लागली. सुदैवाने, सर्व प्रवाशांना वेळेत सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून, यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
