Home Breaking News मराठी न बोलणाऱ्या रिक्षाचालकांवर आजपासून कारवाई; ७,७५० चालक मराठी परीक्षेत नापास.

मराठी न बोलणाऱ्या रिक्षाचालकांवर आजपासून कारवाई; ७,७५० चालक मराठी परीक्षेत नापास.

53
0

मराठी न बोलणाऱ्या रिक्षाचालकांवर आजपासून कारवाई; ७,७५० चालक मराठी परीक्षेत नापास.

मुंबई : मराठी भाषेचा वापर आणि ज्ञान वाढवण्यासाठी राज्यात रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी घेण्यात आलेल्या मराठी भाषा परीक्षेत तब्बल ७ हजार ७५० चालक नापास झाल्याची माहिती समोर आली आहे. या चालकांवर आजपासून कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी परिवहन विभागाकडून परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी चालकांना मराठी भाषा शिकण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, परीक्षेला बसलेल्या चालकांपैकी ७,७५० चालक अपेक्षित निकष पूर्ण करू शकले नाहीत.

१५ ऑगस्ट रोजी मराठी भाषा परीक्षेची मुदत संपली असून, त्यानंतरही मराठीचे आवश्यक ज्ञान नसलेल्या चालकांवर नियमांनुसार कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

मराठी भाषेचा सन्मान राखणे तसेच राज्यातील सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या चालकांना स्थानिक भाषेचे मूलभूत ज्ञान असणे, या उद्देशाने ही परीक्षा घेण्यात आली होती. त्यामुळे आता नापास झालेल्या चालकांवर कोणती कारवाई होते, याकडे रिक्षा-टॅक्सी चालकांचे लक्ष लागले आहे.