Home Breaking News पुणे ग्रामीण पोलिसांची कोल्हापूर परिक्षेत्रीय कर्तव्य मेळाव्यात दमदार कामगिरी.

पुणे ग्रामीण पोलिसांची कोल्हापूर परिक्षेत्रीय कर्तव्य मेळाव्यात दमदार कामगिरी.

85
0

पुणे ग्रामीण पोलिसांची कोल्हापूर परिक्षेत्रीय कर्तव्य मेळाव्यात दमदार कामगिरी.

पुणे :दि : ७ ऑगस्ट; कोल्हापूर येथे ३ ते ५ ऑगस्ट २०२६ दरम्यान झालेल्या २१व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा २०२६ मध्ये पुणे ग्रामीण पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी करत जनरल चॅम्पियनशिप शिप पटकावली. 

या कर्तव्य मेळाव्यात पुणे ग्रामीण, सातारा, सांगली, सोलापूर ग्रामीण आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते. पुणे ग्रामीण पोलिसांच्या एकूण ४ पोलीस अधिकारी व १८ पोलीस अंमलदारांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला.

मेळाव्यात Scientific Aids to Investigation, Police Photography, Police Videography, Anti Sabotage Check, Computer Awareness आणि Dog Squad अशा एकूण ६ प्रमुख प्रकारांतील १९ उपस्पर्धा घेण्यात आल्या. 

पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने या स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवत एकूण ४० सुवर्ण, ९ रौप्य आणि ८ कांस्य पदके, अशी एकूण ५७ पदके मिळवली. या कामगिरीच्या जोरावर पुणे ग्रामीण पोलिसांनी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून जनरल चॅम्पियनशिप मिळवली.

या यशामध्ये पोलीस निरीक्षक विनय बहिर, सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम, सहायक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे, पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड, पोलीस अंमलदार स्वप्नील गांडेकर, फोटोग्राफर आर.डी. शिंदे, सहायक फौजदार राजू जडार, पोलीस अंमलदार यश कठाळे, तसेच तोफिक एन. शेख आणि कोंडू सावंत यांचा विशेष सहभाग राहिला. 

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आली. विजेत्या अधिकारी व अंमलदारांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक व अभिनंदन केले.