Home Breaking News तळेगाव–चाकण–शिक्रापूर मार्गावर तास वाहतूक बंद!

तळेगाव–चाकण–शिक्रापूर मार्गावर तास वाहतूक बंद!

37
0

तळेगाव–चाकण–शिक्रापूर मार्गावर तास वाहतूक बंद!

देहू फाटा ते माणिक चौक दरम्यान २४ तास वाहतुकीवर निर्बंध; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन.

पिंपरी-चिंचवड | ३० ऑगस्ट २०२६ :

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते दुरुस्तीच्या कामामुळे तळेगाव–चाकण–शिक्रापूर मार्गावरील देहू फाटा ते माणिक चौक या मार्गावर वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

फोटोतील अधिसूचनेनुसार २९ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १० वाजल्यापासून ३० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १० वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद/पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. रस्त्यावर दुसऱ्या टप्प्यातील काम, खडीकरण व साईड पट्टा भरण्याचे काम सुरू असल्याने वाहतूक सुरू ठेवल्यास कामात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याचे अधिसूचनेत नमूद आहे.

🔄 वाहनांसाठी पर्यायी मार्ग

शिक्रापूरकडून येणारी वाहने माणिक चौक, मच्छी मार्केट, मुटकवाडी चौक, बंगला वस्ती, आंबेडी फाटा आदी मार्गाने वळविण्यात येणार.

तळेगाव–चाकणकडे जाणारी वाहने पर्यायी मार्गाने इच्छित स्थळी जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

देहू गावाकडून महाळुंगे–चाकणकडे जाणारी वाहने पांढरवाडी चौकातून वळवून पुढे पाठविण्यात येणार आहेत.

वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा तसेच वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिसूचना जारी करणारे:

विक्रांत देशमुख, पोलीस उप-आयुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड.

पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक व्यवस्थेत रस्ते कामांमुळे वेळोवेळी बदल करण्यात येत असल्याचे यापूर्वीही वाहतूक विभागाच्या सूचनांमध्ये दिसून आले आहे