Home Breaking News अवैध दारू विक्रीवर लोणी काळभोर पोलिसांची धडक कारवाई.

अवैध दारू विक्रीवर लोणी काळभोर पोलिसांची धडक कारवाई.

43
0

अवैध दारू विक्रीवर लोणी काळभोर पोलिसांची धडक कारवाई.

लोणी काळभोर, दि. 28 ऑगस्ट : लोणी काळभोर पोलिसांनी अवैध दारू विक्रीविरोधात सलग दोन दिवस धडक कारवाई करत कुंजीरवाडी आणि थेऊर परिसरातील दोन ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत कुंजीरवाडी येथून 10 लिटर गावठी हातभट्टीची दारू, तर थेऊर येथील पानटपरीतून देशी-विदेशी दारूच्या बाटल्या व ₹1,150 रोख, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

कुंजीरवाडी येथे पोलिसांची चाहूल लागताच दादा विलास सकट हा संशयित अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाला. घटनास्थळी सापडलेल्या दोन प्लास्टिकच्या कॅनमध्ये गावठी हातभट्टीची दारू आढळून आली. पोलिसांनी सुमारे ₹2 हजार किमतीची 10 लिटर दारू जप्त करून उर्वरित दारू नष्ट केली. याप्रकरणी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, थेऊर रोडवरील सोनाई पान शॉपवर केलेल्या कारवाईत टँगो पंच देशी दारूच्या तीन बाटल्या, रॉयल स्टॅग व्हिस्कीची एक बाटली आणि ₹1,150 रोख, असा एकूण ₹1,550 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी चेतन अंकुश घुले (वय 21) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अवैध दारू विक्रीविरोधातील या कारवाईमुळे परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, पुढील तपास लोणी काळभोर पोलिसांकडून सुरू आहे.