Home Breaking News महापौर रवि लांडगे यांच्या उपस्थितीत प्रस्तावित मेट्रो मार्गांच्या डीपीआरचे सादरीकरण.

महापौर रवि लांडगे यांच्या उपस्थितीत प्रस्तावित मेट्रो मार्गांच्या डीपीआरचे सादरीकरण.

37
0

महापौर रवि लांडगे यांच्या उपस्थितीत प्रस्तावित मेट्रो मार्गांच्या डीपीआरचे सादरीकरण.

शहराच्या भविष्यातील विकासाला पूरक नियोजनावर भर.. 

  पिंपरीदि. २७ जुलै  :–  “पिंपरी चिंचवडच्या  विकासाचा  वेग  लक्षात घेता मेट्रोचे नियोजन केवळ आजच्या गरजांसाठी नव्हेतर पुढील अनेक दशकांचा विचार करून करण्यात यावेनागरिकांच्या हिताचासर्वसमावेशक आणि भविष्योन्मुख मेट्रो प्रकल्प साकारण्यासाठी प्रस्तावित मेट्रो मार्गांच्या डीपीआरमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात,” असे निर्देश महापौर रवि लांडगे यांनी महामेट्रोला दिले. 

   महापौर रवि लांडगे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकरखासदार श्रीरंग बारणेआमदार उमा खापरे,महेश लांडगे,शंकर जगतापउपमहापौर शर्मिला बाबर,स्थायी समिती सभापती अभिषेक बारणेसत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळेविरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईरशिवसेना गटनेते विश्वजीत बारणेरिपब्लिकन पार्टीचे खुणाल वाव्हळकरशहर अभियंता मनोज सेठीयाअतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच महामेट्रो आणि महापालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. 

 बैठकीत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी संगणकीय प्रणालीद्वारे प्रस्तावित मेट्रो विस्ताराचे सादरीकरण केलेमहामेट्रोकडून  मेट्रो मार्गांच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे (DPR) सादर करण्यात आलाप्रस्तावित मार्गत्यांची व्यवहार्यताप्रवासी क्षमताभविष्यातील विस्तारविविध सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांशी समन्वय तसेच शहराच्या विकास आराखड्याशी सुसंगत नियोजन याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली 

 यावेळी शहरातील नव्याने विकसित होत असलेले निवासी परिसरऔद्योगिक वसाहतीआयटी पार्कशैक्षणिक संस्थाव्यापारी केंद्रे तसेच प्रमुख वाहतूक मार्गांना मेट्रो नेटवर्कशी प्रभावीपणे जोडण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आलीभविष्यातील लोकसंख्या वाढ आणि शहराच्या विस्तारणाऱ्या सीमांचा विचार करून डीपीआरमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याबाबत मान्यवरांकडून सूचना करण्यात आल्या. 

 मेट्रो स्थानकांपर्यंत नागरिकांना सहज पोहोचता यावेयासाठी बस सेवापार्किंगमल्टी मोडल  कनेक्टिव्हिटीपादचारी मार्गसायकल ट्रॅक आणि ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी‘ यांचा प्रभावी समावेश असावाअशी अपेक्षा मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आलीतसेच मेट्रो प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यासप्रदूषणावर नियंत्रण मिळण्यासऔद्योगिक आणि आयटी क्षेत्राच्या वाढीस चालना मिळण्यास तसेच नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात मोठी सुलभता निर्माण होणार असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. 

  यावेळी महापौर रवि लांडगे म्हणाले, “पिंपरी चिंचवड हे  देशातील झपाट्याने  विकसित  होणाऱ्या  शहरांपैकी  एक  आहेआगामी काळातील लोकसंख्याऔद्योगिक आणि आयटी क्षेत्राचा विस्तार तसेच नागरिकांच्या वाढत्या प्रवासाच्या गरजा लक्षात घेऊन मेट्रो प्रकल्पाचे नियोजन करण्यात यावेआजच्या गरजांसोबतच पुढील अनेक दशकांचा विचार करून तयार होणारे मेट्रो नेटवर्क शहराच्या विकासाला नवी दिशा देईलत्यामुळे डीपीआरमध्ये आवश्यक त्या सुधारणा करून नागरिकांच्या हिताचासर्वसमावेशक आणि भविष्योन्मुख मेट्रो प्रकल्प साकारावा.”