Home Breaking News पुणे ग्रामीणच्या खेड, इंदापूर, हवेली आणि बारामतीत हद्दीत फसवणूक, चोरी आणि अपहाराच्या...

पुणे ग्रामीणच्या खेड, इंदापूर, हवेली आणि बारामतीत हद्दीत फसवणूक, चोरी आणि अपहाराच्या गुन्ह्यांची मालिका; लाखो रुपयांचा ऐवज लंपास.

41
0

पुणे ग्रामीणच्या खेड, इंदापूर, हवेली आणि बारामतीत हद्दीत फसवणूक, चोरी आणि अपहाराच्या गुन्ह्यांची मालिका; लाखो रुपयांचा ऐवज लंपास.

Pune : 7 जुलै;पुणे ग्रामीण पोलीस हद्दीत विविध पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात फसवणूक, चोरी आणि अपहाराचे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. खेड, इंदापूर, हवेली आणि बारामती शहर पोलीस ठाण्यांत स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

खेड तालुक्यातील रेखेवाडी येथे फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देत ₹2 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदापूरमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे घरात प्रवेश करून तब्बल ₹2.50 लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे.

हवेली तालुक्यात पोस्ट कार्यालयातील खातेदाराच्या रकमेतून ₹2.67 लाखांचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून संबंधित प्रकरणाचा तपास सुरू आहे. तर बारामती शहरात एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधील सुमारे ₹1.76 लाखांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली आहे. सर्व प्रकरणांचा पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुर आहे.