मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात भव्य महारक्तदान शिबिर यशस्वी; ४७२९ रक्तपिशव्यांचे संकलन!
चिंचवड, पिंपरी आणि भोसरी विधानसभा निहाय ३२ प्रभागांतून ४३ ठिकाणी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी-चिंचवड:
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा.ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने आणि पिं.चिं.मनपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या नेतृत्वाखाली बुधवार, दि. २२ जुलै २०२६ रोजी शहरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य महारक्तदान शिबिराला नागरिकांचा अभूतपूर्व व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरामध्ये पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघांमधील ३२ प्रभागांतून तब्बल ४३ ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

या महाआरोग्य व रक्तदानाच्या उपक्रमांतर्गत शहरातील नागरिकांनी, युवकांनी आणि महिलांनी मोठ्या संख्येने पुढे येत रक्तदान केले. तिन्ही विधानसभा मतदारसंघांतील विविध प्रभागांमधील शाळा, मंगल कार्यालय, सभागृह, देवस्थाने आणि संपर्क कार्यालयांमध्ये उभारण्यात आलेल्या ४३ केंद्रांवर दिवसभर उत्साह पाहायला मिळाला. या सर्व केंद्रांवर मिळून एकूण ४,७२९ रक्तपिशव्यांचे विक्रमी संकलन करण्यात आले आहे.