Home Breaking News पत्नीबाबत वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; शिरूरमध्ये दोघांविरुद्ध गुन्हा

पत्नीबाबत वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; शिरूरमध्ये दोघांविरुद्ध गुन्हा

24
0

पत्नीबाबत वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; शिरूरमध्ये दोघांविरुद्ध गुन्हा.

शिरूर, पुणे २२ जुलै : पत्नीसंबंधी झालेल्या वादातून एका २५ वर्षीय तरुणावर लाकडी दांडका, दगड व लाथाबुक्क्यांनी हल्ला केल्याची घटना शिरूर बायपास परिसरात घडली. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी ओंकार दोस्तगीर काळे (रा. सोनेसांगवी, ता. शिरूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २० जुलै २०२६ रोजी रात्री १० ते १०.३० वाजण्याच्या सुमारास शिरूर बायपासजवळ आरोपी स्वप्नील बबन काळे व शबीर इनुस भोसले यांनी पत्नीच्या कारणावरून वाद घालत शिवीगाळ केली. त्यानंतर लाकडी दांडक्याने, दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून फिर्यादीसह त्यांच्या पत्नीला दुखापत केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर पोलीस करत आहेत