Home Breaking News माळशेज घाटातील रस्ता खचल्याने आळेफाटा–अहिल्यानगर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद.

माळशेज घाटातील रस्ता खचल्याने आळेफाटा–अहिल्यानगर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद.

56
0

माळशेज घाटातील रस्ता खचल्याने आळेफाटा–अहिल्यानगर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद.

माळशेज:२५ जुलै ; मुसळधार पावसामुळे माळशेज घाटातील करंजाळे गावाजवळ रस्ता खचल्याने आळेफाटा–अहिल्यानगरकडे जाणारी वाहतूक तात्पुरती पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना या मार्गाने प्रवास टाळण्याचे आवाहन केले असून परिस्थिती सुधारल्यानंतरच वाहतूक पूर्ववत करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग सुचविण्यात आले आहेत. पहिला मार्ग मुरबाड–म्हसा–कर्जत–खोपोली–पुणे–अहिल्यानगर असा असून, दुसरा मार्ग मुरबाड–शहापूर–नाशिक–संगमनेर–आळेफाटा–अहिल्यानगर असा आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.