Home Breaking News पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रोची पहिली ट्रायल यशस्वी; लवकरच वाहतुकीच्या कोंडीतून दिलासा.

पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रोची पहिली ट्रायल यशस्वी; लवकरच वाहतुकीच्या कोंडीतून दिलासा.

48
0

पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रोची पहिली ट्रायल यशस्वी; लवकरच वाहतुकीच्या कोंडीतून दिलासा.

पुणे:३० जुलै ;पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडीने त्रस्त असलेल्या लाखो प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. बहुप्रतीक्षित हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो मार्ग ३ वरील पहिली ट्रायल रन यशस्वीरीत्या पार पडली आहे. या यशस्वी चाचणीमुळे मेट्रो सेवा सुरू होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले असून, लवकरच प्रवाशांसाठी सेवा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
८,३१३ कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील माण ते आर. के. लक्ष्मण म्युझियम (बालेवाडी) हा सुमारे १३ किलोमीटरचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, या मार्गाला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून तात्पुरती सुरक्षा मंजुरी मिळाली आहे. या टप्प्यातील पहिल्या १२ स्थानकांवरून मेट्रो सेवा सुरू करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर या संपूर्ण मार्गावर एकूण २३ स्थानके असणार आहेत. या मार्गामुळे हिंजवडी आयटी पार्क, बालेवाडी, विद्यापीठ परिसर आणि शिवाजीनगर यांच्यातील प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे. विशेषतः आयटी क्षेत्रातील हजारो कर्मचारी आणि रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.
ट्रायल रन यशस्वी झाल्यानंतर आता उर्वरित तांत्रिक चाचण्या आणि अंतिम परवानग्या पूर्ण करण्याचे काम वेगाने सुरू आहे. मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर पुण्यातील वाहतूक कोंडी कमी होण्यास आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.