Home Breaking News लोणावळा शहराचा कायापालट व  महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आढावा बैठक.

लोणावळा शहराचा कायापालट व  महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आढावा बैठक.

56
0

लोणावळा शहराचा कायापालट व  महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आढावा बैठक.

लोणावळा: २० एप्रिल २०२६ रोजी खासदार श्री. श्रीरंग आप्पा बारणे यांच्या अध्यक्षतेखाली व सुनील शेळके यांच्या उपस्थितीत लोणावळा शहराचा कायापालट करण्यासाठी आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आढावा बैठक पार पडली.

शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपण भांगरवाडी रेल्वे पूल, भाजी मंडई, नगर परिषद स्मार्ट स्कूल, ओपन जिम, घरकुल योजना, गावांतर्गत विविध रस्ते, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, तसेच खंडाळा येथील शाळा यांसारख्या लोकउपयुक्त प्रकल्पांना सर्वोच्च प्राधान्य दिले

लोणावळा शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सुख-सोयींसाठी आम्ही लोकप्रतिनिधी सदैव कटिबद्ध असून, विकासाचा हा प्रवास असाच अखंडपणे सुरू ठेवण्याचा संकल्प आहे.

तसेच केंद्रस्तरावर रेल्वे विभागाशी निगडीत भुशी येथील स्थानिक व्यावसायिकांचा प्रश्न तसेच इतरही अनेक विकासकामांसाठीची रेल्वे विभागाची आवश्यक परवानगी याकरिता संबंधित अधिका-याशी त्वरित बैठक लावून सदर प्रश्न मार्गी लावणेबाबत खासदार सो यांनी आश्वासित केले