पुण्यात अवकाळी पावसाचे थैमान तसंच ग्रामीण भागात गारपीट !

पुणे: २एप्रिल,अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, ज्यामुळे भरदिवसा अंधार पसरला आणि तापमानात मोठी घट झाली आहे बाणेर, बालेवाडी, शिवाजीनगर, कोथरूड आणि वारजेसह अनेक उपनगरांमध्ये विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहून गारांचा पाऊस पडला.
शहरातील बहुतांश भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू असून, रस्त्यांवर अक्षरशः पाणी वाहताना दिसत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. पुण्यात आज दुपारी आलेल्या पावसामुळं रस्त्यांवरुन पाणी वाहताना दिसून येत आहे. पुण्यात पावासमुळं भरदिवसा अंधाराची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळं काही वाहनचालकांनी वाहनांच्या हेडलाईट सुरु केल्याचं पाहायला मिळालं आहे.
पुण्यात जवळपास एक तासांहून अधिक काळ मुसळधार पाऊस पडला. पुण्यात मुसळधार पाऊस सुरु असून ग्रामीण भागात गारपीट झाल्याचं पाहायला मिळालं.