Home Breaking News इराण वि. इस्रायल-अमेरिकेच्या युद्धाचा परिणाम हवाई प्रवासावरही होणार,विमान प्रवास महागणार.

इराण वि. इस्रायल-अमेरिकेच्या युद्धाचा परिणाम हवाई प्रवासावरही होणार,विमान प्रवास महागणार.

38
0

इराण वि. इस्रायल-अमेरिकेच्या युद्धाचा परिणाम हवाई प्रवासावरही होणार,विमान प्रवास महागणार.

इराण वि. इस्रायल-अमेरिकेच्या युद्धाच्या भुर्दंड अख्ख्या जगाला सहन करावा लागत आहे  ,भारतात ही या युद्धाचा परिणाम  दिसत आहे.

मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि जेट इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे, आता इंडिगोने मोठा निर्णय घेतला असून त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसणार आहे. नवीन इंधन शुल्क लागू करण्यात येणार असून त्यामुळे विमान प्रवास महागू शकतो,

देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोने (IndiGo)तिकिटांवर नवीन शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. 14 मार्च, म्हणजे आजपासूनच मार्चपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान तिकिटांवर 425 ते 2,300 रुपयांपर्यंत अतिरिक्त शुल्क आकारले जाईल अशी घोषणा कंपनीद्वारे करण्यात आली आहे.

जेट इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. यामुळे विमान कंपनीच्या खर्चात अचानक वाढ झाली आहे, ज्यामुळे हे अतिरिक्त शुल्क आकारला जात आहे असं इंडिगोचे म्हणणं आहे.