Home Breaking News इराण युद्धाविषयी : भारताने आपली समुद्री सुरक्षा आणि ऊर्जा पुरवठा मजबूत करण्यासाठी...

इराण युद्धाविषयी : भारताने आपली समुद्री सुरक्षा आणि ऊर्जा पुरवठा मजबूत करण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं आहे.

50
0

इराण युद्धाविषयी : भारताने आपली समुद्री सुरक्षा आणि ऊर्जा पुरवठा मजबूत करण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं आहे.

मध्य पूर्व  देशातील  वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने आपली समुद्री सुरक्षा आणि ऊर्जा पुरवठा मजबूत करण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं आहे. भारतीय नौदलाने ओमानची खाडी आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुज जवळ आपल्या युद्धनौकांची संख्या वाढवली आहे. या भागातून तेल-गॅस वाहतुकीला असलेला धोका लक्षात घेऊन भारतीय नौदलाने हा निर्णय घेतला आहे. भारतीय झेंडा असलेले टँकर्स आणि जहाजांना सुरक्षित भारतात आणणं हा नौदलाचा मुख्य उद्देश आहे. याच सुरक्षा घेऱ्यातून INS शिवालिक, आयएनएस सुनयना आणि जग लाडकी ही जहाजं सुरक्षितरित्या भारतीय बंदरात पोहोचली आहेत.

सामान्यत: भारताच्या 1 ते 3 युद्धनौका तैनात असतात. पण आता यांची संख्या पहिल्यापेक्षा वाढवण्यात आली आहे. किती युद्धनौका नेमक्या तैनात केल्या आहेत, ते सुरक्षा कारणांमुळे सांगितलेलं नाही. भारतीय जहाजांना धोकादायक भागातून सुरक्षितरित्या बाहेर काढणं हे तैनात युद्धनौकांचं मुख्य काम आहे

सध्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये भारताची 22 जहाजं आहेत. भारतीय नौदलाचं या स्थितीवर अत्यंत बारीक लक्ष आहे.वाढत्या क्षेत्रीय तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने हे रणनितीक पाऊल उचललं आहे. भारताने आम्ही आमची जहाजं आणि तेल पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी प्रसंगी आवश्यक पावलं उचलू शकतो हे संकेत दिले आहेत.