Home Breaking News स्वाभिमानी विकास पॅनलला आदिवासी पारधी समाजाचा जाहीर पाठिंबा; मांडवगण फराटा येथे विजयाचा...

स्वाभिमानी विकास पॅनलला आदिवासी पारधी समाजाचा जाहीर पाठिंबा; मांडवगण फराटा येथे विजयाचा निर्धार

98
0
प्रतिनिधी – श्रावणी कामत | शिरूर
शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून, स्वाभिमानी विकास पॅनलला विविध समाजघटकांकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळताना दिसत आहे. विशेषतः मांडवगण फराटा येथे आदिवासी पारधी समाज सुरक्षा दल व रिपब्लिकन जनशक्ती पक्षाने स्वाभिमानी विकास पॅनलला जाहीर पाठिंबा दर्शविल्याने या पॅनलची ताकद अधिक वाढली आहे.
घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक आणि शिरूर तालुक्यातील जनतेच्या मनातील लोकनेते म्हणून ओळख असलेले दादा पाटील फराटे यांनी स्व. अजित दादा पवार यांच्या विचारसरणीवर चालत ‘स्वाभिमानी विकास आघाडी’चा पॅनल उभारला आहे. “कपबशी” आणि “छत्री” या निवडणूक चिन्हांवर हे उमेदवार निवा‌डणुकीच्या मैदानात उतरले असून मतदारसंघात विकासकामांचा ठसा उमटवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
या पॅनलमध्ये
🔹 दादा पाटील फराटे – जिल्हा परिषद (कपबशी)
🔹 विजेंद्र गद्रे – पंचायत समिती (छत्री)
🔹 सौ. दिपाली महेंद्र नागवडे – पंचायत समिती
यांचा समावेश आहे.
नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
गेल्या कार्यकाळात विकासकामे अपेक्षित प्रमाणात झाली नसल्याने मतदारांमध्ये नाराजी असल्याचे दिसून येत आहे. रस्ते, पाणीपुरवठा, शेतकऱ्यांसाठी सुविधा, शिक्षण व आरोग्य सेवा या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे यंदा बदल घडवून आणण्याचा निर्धार मतदारांनी केला आहे.
मांडवगण फराटा येथे स्व. अजित दादा पवार यांच्या शोकसभेनंतर नागरिकांनी “कपबशी व छत्रीला मतदान करून त्यांना खरी श्रद्धांजली वाहू” असा निर्धार व्यक्त केला. या वेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत स्वाभिमानी विकास पॅनलला विजयी करण्याचे आवाहन केले.
समाजघटकांचा ठाम पाठिंबा
आदिवासी पारधी समाज सुरक्षा दल आणि रिपब्लिकन जनशक्ती पक्षाच्या वतीने या पॅनलला अधिकृत पाठिंबा जाहीर करण्यात आला. संघटनेचे संस्थापक माऊली उर्फ किसन रामा भोसले, जिल्हाध्यक्ष सागर चव्हाण, उपाध्यक्ष सुहास भोसले, तसेच महिला आघाडीच्या सीमा पवार, शोभा काळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला शिरूर हवेलीचे आमदार मा. माऊली आबा कटके, सुधीर फराटे, सौ. समीक्षा फराटे पाटील, अक्षय पाटील फराटे, बाळासाहेब फराटे, तंटामुक्ती अध्यक्ष हनुमंत अण्णा फराटे पाटील, बाबासाहेब फराटे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
विकासाचे आश्वासन
दादा पाटील फराटे यांनी यावेळी बोलताना सांगितले, “शेतकरी, कामगार, सर्वसामान्य कुटुंबांचा विकास हाच आमचा मुख्य उद्देश आहे. गावागावात पायाभूत सुविधा, रोजगारनिर्मिती आणि पारदर्शक प्रशासन देण्याचा आमचा संकल्प आहे.”
स्वाभिमानी विकास पॅनलच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून मतदारसंघात विकासाचा नवा अध्याय लिहिण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.