सातारा | प्रतिनिधी
ज्येष्ठ नेते, समाजकारणातील अनुभवी मार्गदर्शक आणि कार्यकर्त्यांचे आधारस्तंभ असलेले स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेस विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. यावेळी सर्वांनी दादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपूर्ण अभिवादन केले.
शोकसभेत उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या सामाजिक कार्याची, नेतृत्वगुणांची आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याची आठवण करून दिली. समाजकारणात निष्ठा, प्रामाणिकपणा आणि संघर्षाची शिकवण देणारे त्यांचे विचार आजही अनेकांच्या मनात कोरलेले असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
विचारांचा वारसा


