शिवजयंती निमित्त हिंजवडी परिसरात गुरुवारी (१९ फेब्रुवारी) दुपारी ३ ते रात्री ११ या कालावधीत वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश पोलीस उपायुक्त (वाहतूक) विवेक पाटील यांनी जारी केले आहेत.
हिंजवडी गावठाण येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर ते छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक या मार्गावर भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत हजारो नागरिक सहभागी होणार असल्याने संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे.
महाराज चौक हा मार्ग पूर्णपणे बंद राहील.
पर्यायी मार्गांची व्यवस्था
मारुंजी वाय जंक्शनकडून येणारी वाहने
कस्तुरी चौक → विनोदे वस्ती → इंडियन ऑइल चौक मार्गे वळविण्यात येतील.
मेझा नऊ चौकाकडून हिंजवडी गावठाणकडे जाणारी वाहतूक
श्री शिवाजी महाराज चौक → इंडियन ऑइल चौक → कस्तुरी चौक → विनोदे वस्ती मार्गे जाईल.
शिवाजी चौकातून यू-टर्न घेऊन जांभुळकर जिम चौक मार्गे जाणारी वाहतूक
जांभुळकर जिम चौक → इंडियन ऑइल चौक → कस्तुरी चौक → विनोदे वस्ती चौक मार्गे वळवली जाईल.
लेनमध्ये बदल
मेझा नऊ चौक ते श्री शिवाजी महाराज चौक या मार्गावरील दोन लेनपैकी डावी लेन बंद राहील.
सर्व वाहतूक उजव्या लेनने सुरू राहील
वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
