Home Breaking News ‘भारत-पाक सीजफायर चीनमुळे?’ ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानचे नवे दावे, ट्रंपनंतर ड्रॅगनलाही खूश करण्याचा...

‘भारत-पाक सीजफायर चीनमुळे?’ ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानचे नवे दावे, ट्रंपनंतर ड्रॅगनलाही खूश करण्याचा प्रयत्न

44
0
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरला जवळपास सात महिने उलटून गेले असतानाही पाकिस्तानचा खोटेपणाचा सिलसिला थांबलेला नाही. आधी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना खूश करण्यासाठी मध्यस्थीचा दावा करणाऱ्या पाकिस्तानने आता थेट चीनने भारत-पाकिस्तानदरम्यान सीजफायर घडवून आणला, असा नवा दावा केला आहे. या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात नवी चर्चा रंगली आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ताहिर अंद्राबी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ऑपरेशन सिंदूरच्या काळात चिनी नेतृत्व पाकिस्तानच्या सातत्याने संपर्कात होते. एवढेच नव्हे तर चीनने भारताशीही संवाद साधल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, भारत सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.
तज्ज्ञांच्या मते, ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर निर्णायक कारवाई केल्यानंतर पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली नामुष्की झाकण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकेनंतर आता चीनचे नाव पुढे करून, आपली प्रतिमा ‘शांततेचा समर्थक’ म्हणून रंगवण्याचा डाव पाकिस्तान खेळत असल्याचे मानले जात आहे.
भारताने याआधीच स्पष्ट केले आहे की, भारत-पाक प्रश्नांमध्ये कोणत्याही तृतीय पक्षाची मध्यस्थी स्वीकारली जात नाही आणि सर्व निर्णय भारताच्या सार्वभौम हितानुसारच घेतले जातात. त्यामुळे पाकिस्तानचे हे दावे केवळ आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल करण्यासाठी असल्याचे राजनैतिक वर्तुळात बोलले जात आहे.
दरम्यान, चीन-पाकिस्तान मैत्री आणि सीपेकसारख्या प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानकडून चीनची बाजू उचलून धरणे हे रणनीतिक दबाव तंत्र असल्याचेही विश्लेषक सांगतात. मात्र, वास्तव हेच आहे की ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानला शस्त्रसंधीसाठी पुढाकार घ्यावा लागला, हे जगासमोर स्पष्ट झाले होते.