Home Breaking News प्रभाग २५ (क) मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राधिका कुलकर्णी मैदानात;...

प्रभाग २५ (क) मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राधिका कुलकर्णी मैदानात; ‘घड्याळ’ चिन्हावर मतदानाचे आवाहन

62
0
प्रतिनिधी :- आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ (क) — सर्वसाधारण ओपन महिला वॉर्ड मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या वतीने अँड. राधिका उल्लास कुलकर्णी या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. तरुण, अभ्यासू आणि जनसेवेसाठी कटिबद्ध उमेदवार म्हणून राधिका कुलकर्णी यांची ओळख असून, त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभागात राजकीय वातावरण तापले आहे.
निवडणुकीत राधिका कुलकर्णी यांना अ. क्र. २ — ‘घड्याळ’ हे निवडणूक चिन्ह मिळाले असून, “घड्याळाच्या बटनावर मतदान करून प्रचंड बहुमताने विजयी करा,” असे आवाहन त्या सातत्याने मतदारांना करत आहेत. शनिवार पेठ, महात्मा फुले मंडई परिसर या प्रभागात येत असून, स्थानिक प्रश्न, नागरिकांच्या समस्या आणि विकासकामांबाबत त्या घराघरांत जाऊन संवाद साधत आहेत.
महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी वर्ग आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न समजून घेत पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, ड्रेनेज, आरोग्य सेवा, महिला सुरक्षा आणि मूलभूत नागरी सुविधा यांना प्राधान्य देण्याचा निर्धार राधिका कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे. “महानगरपालिकेच्या माध्यमातून शाश्वत विकास, पारदर्शक प्रशासन आणि सर्वसमावेशक प्रगती साधणे हेच आमचे ध्येय आहे,” असे त्या सांगतात.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या धोरणांवर विश्वास ठेवत, विकासाभिमुख आणि लोकाभिमुख राजकारणासाठी प्रभाग २५ (क) मधील मतदारांनी आपल्याला संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. स्थानिक पातळीवर सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, महिलांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे. मतदान दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत मतदान होणार असून, प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीचा उत्सव साजरा करावा, असेही त्यांनी नमूद केले.