प्रतिनिधी — श्रावणी कामत
तळेगाव दाभाडे — सामाजिक कार्य, जनसेवा आणि टीमवर्क यांचा संगम अनुभवायचा असेल तर रोटरी क्लब ऑफ तळेगाव MIDC चे अलीकडील कार्य हे उत्कृष्ट उदाहरण ठरते. डिस्ट्रिक्ट ३१३१ चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर (डी.जी.) रो. संतोष मराठे यांच्या अधिकृत भेटीदरम्यान क्लबच्या सेवा उपक्रमांना मिळालेल्या प्रशंसेने सर्व सदस्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले आहे.
भव्य, शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण डी.जी. व्हिजिट — क्लबची कार्यशैली ठळकपणे झळकली
सायंकाळी ५.३० वाजता डी.जी. मराठे यांच्या स्वागताने या औपचारिक भेटीची सुरुवात झाली.
त्यांच्यासोबत फर्स्ट लेडी रो. तनुजा मराठे, असिस्टंट गव्हर्नर रो. अशोक शिंदे, फाउंडेशन डायरेक्टर रो. राजेश राऊत यांची उपस्थिती सोहळ्यास अधिक दिमाखदार बनवणारी ठरली. डायस कमिटी, स्ट्रॅटेजिक कमिटी यांच्याशी झालेल्या बैठका अत्यंत फलदायी ठरल्या.
फाउंडेशन, मेंबरशिप, पब्लिक इमेज, सर्विस प्रोजेक्ट्स या विभागांवर झालेल्या चर्चांमध्ये क्लबच्या पुढील वाटचालीचे महत्त्वाचे दिशानिर्देश निश्चित झाले. रो. दीपक बागल, माजी अध्यक्ष रो. अजय पाटील, रो. योगेश शिंदे, रो. युवराज पोटे आणि सचिव रो. संदीप मगर यांनी आपल्या विभागातील कार्याचा उत्कृष्ट आढावा सादर केला. २७ सामाजिक प्रकल्पांची यशस्वी अंमलबजावणी — डी.जी. मराठे यांच्याकडून १०० पैकी १०० गुण!
जनरल मीटिंगची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली.
अध्यक्ष रो. प्रवीण भोसले यांनी सांगितल्याप्रमाणे फक्त चार महिन्यांत २७ सामाजिक प्रकल्प राबवून क्लबने समाजसेवेची नवी उंची गाठली आहे. डी.जी. मराठे यांनी क्लबच्या कामगिरीबद्दल थेट शब्दांत गौरवोद्गार काढले —
“हा क्लब शंभर टक्के गुणांसाठी पात्र आहे!” ए.जी. अशोक शिंदे यांनीही क्लबच्या टीमस्पिरिटचे कौतुक करत “ग्रेट वर्क अँड क्लब बिल्डिंग” असे म्हणून अभिनंदन केले.
‘सर्विस एक्सलन्स अवॉर्ड’ — पत्रकार रामदास वाडेकर यांचा सन्मान
या कार्यक्रमाचे मध्यबिंदू ठरला ‘सर्विस एक्सलन्स रोटरी अवॉर्ड’ प्रदान सोहळा.
पत्रकार रामदास वाडेकर यांची निवड हा संपूर्ण मावळ भागासाठी अभिमानाचा क्षण ठरला. त्यांचा गौरव शाल, श्रीफळ, रोप, ‘तळेगाव इतिहास’ पुस्तक आणि सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. त्यांच्या पत्रकारितेमुळे सामाजिक प्रश्नांवर प्रकाश पडला, न्याय मिळाला.
विशेषतः १५ गावांतील मुलींसाठी सुरू केलेल्या “सायकल बँक” उपक्रमाची उपस्थितांनी विशेष दखल घेतली. संस्थापक अध्यक्ष रो. संतोषजी खांडगे यांनी वाडेकर यांच्या कार्याचा भावपूर्ण गौरव केला.
संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांचाही विशेष गौरव
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे तिसऱ्यांदा सचिव म्हणून निवड झाल्याबद्दल
रो. संतोष खांडगे यांचा सन्मान करत सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
बुलेटिन प्रकाशन आणि देणगी सुपूर्द — सेवाभावाचा नवा अध्याय
-
डी.जी. रिपोर्टचे अनावरण
-
रोटल बुलेटिनचे प्रकाशन
-
संपादक रो. सुमती निलवे आणि सहसंपादक रो. गौरी पाटील यांची प्रशंसा


