कोलकाता/नवी दिल्ली – पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा तापलेले वातावरण! तृणमूल काँग्रेस (TMC) ने निवडणूक आयोगावर अत्यंत गंभीर आरोप करत म्हटले की, “निवडणूक आयोगाचे हात खूनाने रंगले आहेत.” TMC ने दावा केला की अलीकडील निवडणूक हिंसेत नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यासाठी आयोगाची बेपर्वाई आणि पक्षपाती कारभार कारणीभूत आहे.