अमेडिया कंपनीकडून तब्बल १८०० कोटींच्या बाजारमूल्याची जमीन केवळ ३०० कोटींना खरेदी केल्याच्या प्रकरणाने राज्यात खळबळ माजली आहे. या व्यवहाराचे काही महत्वाचे कागदपत्रे समोर येत असून, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आता पार्थ पवार यांची सही असलेला पुरावा सार्वजनिक केला आहे.
सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर या जमिन व्यवहाराशी संबंधित एक कागदपत्र शेअर केले असून, त्यावर पार्थ पवार यांची स्पष्ट सही असल्याचे दिसून येते. त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की —
“पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून मुंद्रांक विभाग आणि पोलिस प्रयत्न करत आहेत का? एकच दस्त ९०१८/२२५ नोंदणीत वापरला असताना, आणि जिल्हा इंडस्ट्री बोर्डाच्या मुद्रांक माफीच्या ठरावावर पार्थ पवारांची सही असूनही, चौकशी अहवालात त्यांचं नाव टाळलं का?”

