Home Breaking News “दृश्यम”ची आठवण करून देणारा खून! — अहमदाबादमध्ये पत्नीनेच केला पतीचा खात्मा, मृतदेह...

“दृश्यम”ची आठवण करून देणारा खून! — अहमदाबादमध्ये पत्नीनेच केला पतीचा खात्मा, मृतदेह किचनमध्ये पुरला; ‘रुबी’च्या थरकाप उडवणाऱ्या गुन्ह्याने देश हादरला

38
0
गुजरातच्या अहमदाबादमध्ये घडलेल्या एका भयानक घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. एका पत्नीने स्वतःच्या पतीची हत्या करून मृतदेह घरातच — तेही किचनच्या जमिनीखाली पुरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाने ‘दृश्यम’ चित्रपटातील घटनांची आठवण करून दिली असून, पोलीस तपासात उघड झालेले तपशील अंगावर काटा आणणारे आहेत.
 
अहमदाबादच्या रहिवासी रुबी अन्सारी हिने तिचा पती समीर अन्सारी (वय 35) याची निर्घृणपणे हत्या केली. तिच्या या गुन्ह्यात तिचा प्रियकर इमरान आणि त्याचे काही मित्र सहभागी होते. गेल्या वर्षी 2024 मध्ये समीर अचानक बेपत्ता झाला होता, आणि गेल्या एक वर्षानंतर पोलिसांनी अखेर या रहस्याचा पर्दाफाश केला.
पोलीस सूत्रांनुसार, रुबी आणि समीर यांच्यातील वादाचे मूळ कारण होते रुबीचे इमरानसोबतचे अनैतिक संबंध. सततच्या वादानंतर रुबीने पतीचा कायमचा “तोडगा” काढण्याचा निर्णय घेतला. योजनेप्रमाणे, रुबीने प्रियकरासोबत मिळून समीरला घरात बोलावले, त्याचे हातपाय बांधले आणि त्यानंतर चाकूने भोसकून हत्या केली.
पोलिसांनी सांगितले की, हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करण्यात आले आणि तो किचनच्या जमिनीखाली पुरण्यात आला. त्यावर टाइल्स लावून गुन्ह्याचा कोणताही पुरावा उरला नाही. घरातील कुटुंबीयांना आणि शेजाऱ्यांना काहीच कल्पना नव्हती. समीरचा फोन 14 महिन्यांपासून बंद असल्याने पोलिसांना संशय आला आणि तेथून या गुन्ह्याचा तपास सुरू झाला.
क्राइम ब्रांचच्या चौकशीत इमरानने कबुली दिली, “रुबीनेच सर्व योजना आखली. तिने आधी समीरला बांधले, मग माझ्या मदतीने त्याच्यावर वार केले. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून तो घरातच पुरला.” या कबुलीनंतर पोलिसांनी घटनास्थळी खोदकाम केले असता मृतदेहाचे अवशेष सापडले.
या घटनेमुळे पुन्हा एकदा मुस्कान रस्तोगी (मेरठ) आणि सोनम रघुवंशी (इंदूर) प्रकरणांची आठवण झाली आहे, जिथे पत्नींनी आपल्या नवऱ्यांची भयावह पद्धतीने हत्या केली होती. समाजाला हादरवून सोडणाऱ्या या घटनांनी पुन्हा एकदा ‘मानवी नात्यांच्या विकृत रूपाचा’ उघड झाला आहे. पोलीस तपास सुरू असून रुबी आणि इमरान दोघांनाही अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याने संपूर्ण गुजरातमध्ये खळबळ माजली आहे.