Home Breaking News त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध व्हाईस ऑफ मिडीया तालुका शेगांवची मुख्यमंत्र्यांकडे...

त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध व्हाईस ऑफ मिडीया तालुका शेगांवची मुख्यमंत्र्यांकडे कठोर कारवाईची मागणी

36
0

शेगाव प्रतिनिधी – त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर २० सप्टेंबर रोजी आयोजित बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा व्हाईस ऑफ मिडीया तालुका शेगावच्या वतीने 22 सप्टेंबर रोजी निवेदन दिले आहे. निवेदनात नमूद आहे की, या हल्ल्यात इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे पत्रकार योगेश खरे, अभिजित सोनवणे आणि किरण ताजने गंभीर जखमी झाले आहेत. सुसंस्कृत महाराष्ट्रात घडलेली ही घटना अत्यंत निंदनीय असल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले. पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करावी, तसेच आरोपींविरोधात विशेष सरकारी वकिलांमार्फत खटला चालवून कठोर शासन करावे, अशी मागणी संघटनेतर्फे मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून, अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, असे व्हाईस ऑफ मिडीया तालुका शेगांव यांच्याकडून निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष अमर बोरसे, तालुकाध्यक्ष नानाराव पाटील, तालुका सचिव ज्ञानेश्वर ताकोते, शहराध्यक्ष दिनेश महाजन, डिजिटल मीडिया अध्यक्ष समीर देशमुख, राजवर्धन शेगावकर, ललित देव पुजारी, विठ्ठल अवताडे, प्रकाश उन्हाळे, समीर आझाद, दिनेश घाटोळ आदी पत्रकारांच्या सह्या होत्या